सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (14:31 IST)

उदयनराजे यांचं ‘पुष्पा’ प्रेम, लुंगी नेसून सेल्फी पॉईंटवर पोहोचले; कार्यकर्त्यांना दिलं फ्लाइंग किस

सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. तसेच उदयनराजे आपल्या डायलॉगबाजी आणि हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी साताऱ्यातील पवई नाक्यावर 'राजधानी सेल्फी पॉइंट' वर ते चक्क लुंगी नेसून पोहचले. प्रसारमाध्यमांनी त्यांना लुंगी नेसण्याचं विशेष कारण विचारलं असता, मोकळं वाटतंय, छान वाटतंय असं उत्तर दिलं. उदयनराजेंसोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही लुंगी नेसली होती.
 
यावेळी सेल्फी पॉइंटवर त्यांनी फोटो काढले आणि नंतर गाडीत जाऊन बसले. तर योगायोग असा की गाडीत 'पुष्पा' सिनेमातलंच गाणं सुरू होतं. दरम्यान त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस देत उदयनराजेंनी कॉलर उडवली.
 
पुष्पा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. 'पुष्पा' सिनेमाचं तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम व्हर्जन 7 जानेवारीला अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यानंतर या सिनेमाचं हिंदी व्हर्जनही 14 जानेवारीला रिलीज करण्यात आलं. सोशल मीडियावर सध्या या सिनेमातील डान्सचे आणि संवादांचे धमाल रिल्स मोठ्या प्रमाणात चाहते बनवत आहेत.