‘स्त्री २’ मध्ये वरुण करणार कॅमिओ
श्रद्धाच्या स्त्री २ मध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. या चित्रपटात एक अभिनेता कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून वरुन धवण आहे. सिनेमामध्ये वरुण हा भेडियाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वरुण धवनने अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये स्त्री चित्रपटातील कॅमिओच्या भूमिकेसाठीचे शूटिंग पूर्ण केले आहे.
श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला स्त्री हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकले होते.
Edited by -Ratnadeep Ranshoor