सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (11:36 IST)

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले कोमात, पत्नी म्हणाली - अनेक अवयव काम करत नाहीत, प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. या अभिनेत्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मीडिया हाऊसला माहिती देताना त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की, बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. अभिनेत्याच्या विविध अवयवांनी काम करणे बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली. विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.
 
वृषाली यंनी सांगितले की, "ते प्रतिसाद देत नाहीये. आम्ही त्यांना स्पर्श करत असतानाही त्यांचे शरीर प्रतिसाद देत नाहीये. आता पुढे काय करायचे याचा निर्णय गुरुवारी सकाळी डॉक्टर घेतील. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली होती. तिथे गेल्यावर मात्र त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. त्यांना हृदय आणि किडनीसारख्या अनेक समस्या आहेत. सध्या त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे.
 
शिल्पा शेट्टी आणि अभिमन्यू दासानी यांच्यासोबत 'निकम्मा' चित्रपटात विक्रम शेवटचा दिसला होता. हा चित्रपट यावर्षी जूनमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यांनी वयाच्या 26 व्या वर्षी अमिताभ बच्चन अभिनीत 'परवाना' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 40 वर्षांच्या कारकिर्दीत विक्रम गोखले यांनी विविध मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
 
2010 मध्ये इष्टी या मराठी चित्रपटातील कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.