सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (13:46 IST)

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचं लग्न का मोडलं? इतक्या वर्षांनंतर उघड झाले

बॉलीवूडमध्ये चित्रपटात सोबत काम करत असताना किती तरी स्टार्सचे असापसात नातेसंबंध जुळतात. अभिषेक बच्चन सध्या ऐश्वर्या रायसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. पण ऐश्वर्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेकच्या आयुष्यात करिश्मा कपूर आली होती. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती, पण नंतर ब्रेकअप झाले.
 
आजही लोकांच्या मनात प्रश्न आहे की अभिषेक आणि करिश्मा यांच्यात नेमके काय बिनसले ? आता कितीतरी वर्षांनंतर चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी त्यांच्या एका ताज्या मुलाखतीत अभिषेक आणि करिश्माचे ब्रेकअप का झाले हे उघड केले आहे?
 
रिपोर्ट्सनुसार अभिषेक बच्चन करिश्मा कपूरला जवळपास 5 वर्षे डेट करत होते, त्यानंतर दोघेही अचानक वेगळे झाले. 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'हां मैंने भी प्यार किया'  या चित्रपटातही अभिषेक आणि करिश्माने एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केले होते.
 
'बॉलीवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील दर्शन म्हणाले, अभिषेक आणि करिश्माचे नाते अफवा नसून सत्य होते. पण शूटिंगदरम्यान सुनील दर्शच्या लक्षात आले की दोघेही एकमेकांसाठी बनलेले नाहीत.
 
ते म्हणाले की सेटवर नेहमी दोघांमध्ये भांडण व्हायचे आणि त्यामुळेच मी स्वतः विचार करायचो की हे दोघे एकत्र राहू शकतील का? अभिषेक खूप गोंडस आहे आणि करिश्मा देखील चांगली व्यक्ती आहे, परंतु काही गोष्टी फक्त नशिबाने ठरवल्या जातात.
 
अभिषेकसोबतची सगाई तोडल्यानंतर करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र त्यांचा लग्नाचा अनुभव खूपच वाईट होता. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तर अभिषेक बच्चनने 2007 मध्ये ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.