1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. veteran actress and dancer Bela Bose passes away at the age of 79

'जय संतोषी माँ' फेम अभिनेत्री बेला बोस यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. 20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1941 रोजी कोलकाता येथे झाला. बेला यांनी 1950 ते 1980 दरम्यान 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी जीने की राह आणि जय संतोषी मां सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये चमकदार अभिनय केला.
 
बेला या राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूही होत्या
बेला यांचे लग्न अभिनेता आणि चित्रपट निर्माता आशिस कुमारसोबत झाले होते. अभिनेत्री असण्यासोबतच बेला एक कुशल चित्रकार आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू होत्या. 
 
बेला बोस यांची पहिली प्रमुख भूमिका वयाच्या 21 व्या वर्षी 1962 साली आलेल्या 'सौतेला भाई' चित्रपटात होती. यात त्यांच्या अपोजिट गुरु दत्त दिसले. या अभिनेत्रीला राज कपूरसोबत मोठा ब्रेक मिळाला. 'मैं नशे में हूं' मध्ये त्यांनी राज कपूरसोबत डान्स नंबर केला होता. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता.
 
बेला बोस यांचा जन्म एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. रिपोर्ट्सनुसार ज्या बँकेत त्याच्या कुटुंबाचे सर्व पैसे ठेवले होते, ती बँक बुडाली. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या 36 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचेही रस्ते अपघातात निधन झाले.
 
अचानक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांनी लहान वयातच चित्रपटांमध्ये ग्रुप डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली.
पुढील लेख
दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 रणबीर - आलियाला बेस्ट एक्टर्सचा पुरस्कार