शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (16:21 IST)

विकी कौशल अडचणीत, अभिनेत्या विरोधात तक्रार

विकी कौशल आणि सारा अली खान सध्या मध्य प्रदेशातील इंदूर शहरात त्यांच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लूक आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या रोमँटिक कॉमेडीने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. आता बातमी येत आहे की इंदूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने विक्कीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे
 
तक्रारदार जयसिंग यादव म्हणाले, “चित्रपटात वापरलेला वाहन क्रमांक माझा आहे; चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही हे माहित नाही. पण  हे बेकायदेशीर आहे, परवानगीशिवाय माझी नंबर प्लेट वापरू शकत नाही. मी या वर निवेदन दिले आहे. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे."
बाणगंगा येथील एसआय राजेंद्र सोनी यांनी सांगितले की, “आम्हाला विक्की कौशलविरुद्ध तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून नंबर प्लेटचा गैरवापर झाला की नाही हे पाहिले जाईल. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. चित्रपटाचे युनिट इंदूरमध्ये असल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल. 
 
वृत्तानुसार, विकी कौशल त्याच्या सहकलाकार सारा अली खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठी इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती.