शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (09:39 IST)

मृत्यूनंतर मला खांदा देणारे कोणी नसेल : ऋषी कपूर

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. गुरुवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तंच्या निधनाची बामती आल्यानंतर बॉलिवूडसह त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. बुधवारी इरफान खान यांचे निधन झाले.

दोन दिवसात बॉलिवूडच्या दोन जबरदस्त अभिनेत्यांचे निधन झाल्याने अनेकांनी विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचे 2017 मधील एक टि्वट व्हायरल होत आहे. त्या टि्वटमध्ये ऋषी कपूर जे बोलले होते ते दुर्दैवाने खरे ठरले आहे.

झाले असे होते की, ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर   अंत्संस्कारासाठी नव्या पिढीतील एकही अभिनेता हजर नव्हता. यामुळे ऋषी कपूर प्रचंड नाराज झाले होते. टि्वटरच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, लज्जास्पद नव्या पिढीतील एकाही अभिनेत्याने विनोद खन्ना यांच्या अंत्संस्काराला हजेरी लावली नाही.  यामधील अनेकांनी तर त्यांच्यासोबत काम केलेले आहे. आदर देणे शिकले पाहिजे.
यानंतर संतापलेल्या ऋषी कपूर यांनी अजून एक टि्वट केले होते. या टि्वटमध्ये त्यांनी लिहिले होते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला तयार झाले पाहिजे. कोणीही मला खांदा देणार नाही. स्टार्स म्हणवून घेणार्‍या या सर्वांवर मी प्रचंड नाराज आहे.
दुर्दैवाने ऋषी कपूर यांचे निधन झाल्यानंतर ते शब्द खरे ठरले आहेत. लॉकडाउनमुळे त्यांचे अनेक नातेवाईक, चाहत्यांना त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त 20 लोकांना परवानगी देणत आली.