शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (09:11 IST)

पत्नीला कोरोना झाल्याचं कळाल्यानंतर पतीनं घेतला गळफास

करोनाच्या महामारीविषयी सोशल मीडियावरून येणाऱ्या अफवा आणि दररोज वाढत चालेल्या मृतांच्या आकड्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. करोनाच्या भीतीतूनच एकानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीला करोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पतीनं राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेतला. सकाळी ही घटना उघडकीस आली.
 
“मयत सतबीर सिंग हे आपली पत्नी आणि मुलासह गुरगावमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा फार्मासिस्ट म्हणून कामाला आहे. ही घटना घडली तेव्हा पत्नी आणि मुलगा घरातच झोपलेले होते. रात्री मुलाला जाग आली तेव्हा सतबीर सिंग यांचा मृतदेह बेडरूममधील पंख्याला लटकलेला आढळला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे,” अशी माहिती गुरूगाव पोलीस ठाण्याचे जनसंपर्क अधिकारी सुभाष बोकन यांनी माध्यमांना दिली.