शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पिंपरी , बुधवार, 29 एप्रिल 2020 (08:05 IST)

इन्फोसिसच्या अभियंत्याची वाकड येथे आत्महत्या

वाकड परिसरात इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली. प्रसून कुमार झा (28, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड येथे राहत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी  इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. झा यांचा विवाह निश्चित झाला होता.