सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (16:06 IST)

यामी झाली ट्रोल

बॉलिवूड कलाकार बर्‍याचदा विविध गोष्टींमुळे ट्रोल होत असतात. या यादीमध्ये आता अभिनेत्री यामी गौतम देखील आली आहे. विमानतळावर एका चाहत्याचा अपमान करणे यामीला चांगलेच महागात पडले असून ती सध्या ट्रोलर्सच निशाण्यावर आहे. यामी गौतम काही दिवसांपूर्वी आसामच्या दौर्‍यावर गेली होती. विमानतळावर तिच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या चाहत्यांपैकी एकाने पारंपरिक संस्कृतीप्रमाणे तिचे गमोसा घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला दूर लोटले. 
 
हा प्रसंग तेथील काही लोकांनी आपल कॅमेरत कैद केला. हा प्रकार सोशल मीडिावर व्हारल होताच तिच्यावर चाहत्यांकडून जोरदार टीका झाली. या टीकेपासून बचावासाठी यामीने तत्काळ चाहत्यांची माफी मागितली.