सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (10:34 IST)

हनी सिंगचे ‘लोका’ गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रॅपर आणि बॉलिवूडचा लोकप्रिय गायक हनी सिंग खूप दिवसांनंतर नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. यो यो हनी सिंगचे ‘लोका’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं संगीत खूप जबरदस्त आहे. त्यामुळे हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या गाण्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
 
यो यो हनी सिंगचं ‘लोका’ गाण्याला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. टी-सीरीजने आपल्या युट्युब पेजवर हे गाणं प्रदर्शित केलं आहे. हे गाणं हनी सिंग सोबत सिमर कौरने गायलं आहे.
 
यापूर्वी हनी सिंगचं प्रदर्शित झालेले ‘मखना’ हे गाणं चांगलं चर्चेत आलं होत. ‘मखना’ या गाण्यावरून हनी सिंगला पंजाब महिला आयोगाने नोटीस बजावली होती.