शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (12:08 IST)

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

Manisha Koirala
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनीषासोबत या सिनेमांत निकिता दत्ता, प्रीत कमानी आणि सेंसेशनल युवा गायिका शिरली सेतिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.नुकताच या सिनेमाचा नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्रमोशनल फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर केला आहे. 
 
याआधी नेटफ्लिक्सवर आलेल्या 'लस्ट स्टोरी' हा चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथांचा एक सिनेमा आहे. या सिनेमातील कथांच दिग्दर्शन करण जोहर, अनुराग कश्यप, जोया अख्तर आणि दिवाकर बॅनर्जी यांनी केलं आहे. या सिनेमातून नेटफ्लिक्सवर मनीषा कोइराला पदार्पण केल.