शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (14:26 IST)

सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण

गेल्या काही दिवसांपासून एका स्टारकिडच्या बॉलिवूड पदार्पणाची जोरदार चर्चा आहे. ही स्टारकिड आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेनंतर आता निर्माता - दिग्दर्शक करण जोहर हा सुहानालासुद्धा बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नव्हे तर 'स्टुडंट ऑफ द इअर 3' या चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून यामध्ये ती 'बिग बॉस'च्या तेराव पर्वातील बहुचर्चित स्पर्धकासोबत रोमान्स करताना दिसणार असलचं म्हटलं जात आहे.
'बिग बॉस 13'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या रिअ‍ॅलिटी शोच अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला स्पर्धक असिम रियाझ सुहानासोबत काम करणार असल्याचं समजतं. त्यामुळे असिनसाठी ही सर्वांतमोठी संधी आहे. मात्र करण जोहरने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.