1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)

बालाजीच्या दर्शनासाठी जान्हवी गेली बारा किमी अनवाणी

tirumala tirupati darshan
अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या आगामी चित्रपट आणि नवनवीन  लूकसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र ही अभिनेत्री एका अशा कारणामुळे चर्चेत आली आहे, जे पाहता अनेकांनी तिची प्रशंसा करण्यासही सुरुवात केली आहे. पायात चप्पलही न घालता जान्हवीने तब्बल 12 किमीचा प्रवास केला आहे. आधुनिक विचारसरणीचा विचार करत असतानाही, जान्हवीने देवाप्रती असणारी तिची आस्था तसूभरही कमी होऊ दिलेली नाही. 
 
तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिच्या या अनोख्या प्रवासाविषयी माहिती दिली. व्यंकटेश्वचराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जान्हवी तिरुमला तिरुपती मंदिर येथे पोहोचली. तिचा हा प्रवास जरा जास्तच खास होता, कारण 3500 पायर्‍या चढत तिने देवाचं दर्शन घेण्यासाठी 12 किलोमीटरचा प्रवास पायी केला. चाहत्यांची आणि छायाचित्रकारांची गर्दी या सार्‍यापासून दूर असणार्‍या जान्हवीने यावेळी पांढर रंगाचा ड्रेस घातला होता. ज्याला पिवळ्या रंगाच्या ओढणीची जोड तिने दिली होती. अतिशय सोबर असा तिचा हा लूकसुद्धा चाहत्यांची मनं जिंकून गेला.