संबंधित माहिती
- अमिताभ बच्चन यांची नात आराध्याने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका, जाणून घ्या कारण
- तेलगू अभिनेता आणि कॉमेडियन अल्लू रमेश यांचे निधन
- मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये साहिल खानविरोधात तक्रार
- चित्रपट निर्मात्यांच्या मेहनतीवर आता पाणी जाणार नाही, पायरसी रोखण्यासाठी सरकार आणणार नवा कायदा
- नवाजुद्दीन सिद्दीकी-भूमी पेडणेकर यांच्या 'अफवाह' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
यश चोप्रा यांची पत्नी आणि राणी मुखर्जीच्या सासू पामेला यांचे निधन
Pamela Chopra Death मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची पत्नी आणि राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.
पामेला चोप्राने अनेक YRF चित्रपटांमध्ये लेखक, कॉस्च्युम डिझायनर आणि सह-निर्माता म्हणूनही काम केले. नुकतीच पामेला यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित 'द रोमॅंटिक्स' या डॉक्यूमेंट्री दिसल्या होत्या. यात त्यांनी पती यश चापोडा यांच्या प्रवासाबद्दल सांगितले.
पामेला चोप्रा ही आदित्य आणि उदय चोप्रा यांची आई होती. पामेलाचे पती यश चोप्रा यांचे 11 वर्षांपूर्वी निधन झाले. पामेलाच्या मृत्यूवर कुटुंबाकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
