1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Yash Raj Films announces the release date of Mardaani 3

यश राज फिल्म्सने ‘मर्दानी 3’ ची रिलीज डेट केली जाहीर – राणी मुखर्जीचा स्फोटक फर्स्ट लूक प्रदर्शित!

यश राज फिल्म्सची मर्दानी  सीरीज ही हिंदी सिनेमातील सर्वात मोठी महिला-केंद्रित फ्रेंचायझी मानली जाते, जिला गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रशंसा दिली आहे. ही ब्लॉकबस्टर फ्रेंचायझी आता एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखली जाते आणि सिनेप्रेमींमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.
भारताची सर्वात मोठी आणि एकमेव महिला पोलीस पात्र असलेली फ्रेंचायझी मर्दानी आता तिसऱ्या भागात प्रवेश करत आहे. मर्दानी 3 मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे – जिला न्यायासाठी झगडण्याची प्रेरणा अंतःकरणातून मिळते.
YRF ने आज जाहीर केले की मर्दानी 3 , 27 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात 4 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे निर्माते हा चित्रपट रक्तरंजित व प्रचंड हिंसक संघर्ष म्हणून सादर करत आहेत – शिवानीच्या निखळ चांगुलपणाचा सामना होणार आहे अत्यंत क्रूर वाईट शक्तींशी.
राणी मुखर्जी ने याआधीच स्पष्ट केलं होतं की हा चित्रपट गडद, जीवघेणा आणि निर्दयी असेल – आणि त्यांच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
पुढील लेख
कुछ तो गड़बड़ है दया म्हणत प्रसिद्ध अभिनेता सीआयडीचे एसीपी प्रद्युमन बनले,प्रत्येक भूमिकेत चमकले