रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (11:53 IST)

नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित

Yash Raj Films
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित; राणी मुखर्जी सज्ज चांगल्या आणि वाईटाच्या महासंग्रामाला!" यशराज फिल्म्सने नवरात्रीची सुरुवात खास करत मर्दानी 3 चा नवा पोस्टर लाँच केला आहे.

या पोस्टरमध्ये चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यान होणाऱ्या आगामी महासंग्रामाची चाहूल मिळते! राणी मुखर्जी पुन्हा एकदा सर्वांच्या मनात घर करणाऱ्या तिच्या शूर पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत परतत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

पोस्टरसह जोडण्यात आलेल्या ‘ऐगिरी नंदिनी’ या शक्तीशाली स्तोत्राचा गजर, माता दुर्गेने महिषासुराचा वध करताना दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करतो. यावरून हे स्पष्ट होते की, एका क्रूर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी शिवानीला स्वतःचं जीवन धोक्यात घालून अपार धैर्य दाखवावं लागणार आहे।
 
मर्दानी सीरीज – जी भारतातील एकमेव यशस्वी महिला-प्रधान चित्रपट फ्रँचायझी आहे – आपल्या प्रभावी कथांमुळे प्रेक्षकांच्या मनात सतत ठसा उमटवत आली आहे। या कथा समाजासाठी डोळे उघडणाऱ्या ठरल्या आहेत, ज्या आपल्या देशात रोज घडणाऱ्या भयानक गुन्ह्यांकडे सगळ्यांना पाहायला भाग पाडतात।
 
2014 मधील मर्दानी आणि 2019 मधील मर्दानी 2 या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, तिसरा अध्याय आणखी गडद आणि कठोर ठरणार असून प्रेक्षकांना थेटरमध्ये थरारक आणि रोमांचकारी अनुभव देणार आहे।
 
या प्रतिष्ठित महिला-पोलिस फ्रँचायझीचा तिसरा भाग अभिराज मिनावाला दिग्दर्शित करत आहेत आणि याचे निर्माते आहेत आदित्य चोप्रा। हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे।