रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (12:00 IST)

बॉक्स ऑफिसवर RRR चे तुफान: 'RRR' हिंदी कलेक्शनने 100 कोटींचा आकडा पार केला

निर्माता डी व्ही.व्ही. दानय्या यांच्या 'RRR' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने मंगळवारी100 कोटींचा टप्पा ओलांडला. 'पुष्पा पार्ट 1' या चित्रपटानंतरचा हा दुसरा तेलुगू चित्रपट आहे ज्याने मूळ चित्रपटासोबतच हिंदीतही प्रदर्शित होऊन हा आकडा गाठला आहे.
 
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'रौद्रम रणम रुधिराम' म्हणजेच 'RRR  ने बाजी मारली.  'RRR' चित्रपटाने  'बाहुबली 2' चित्रपटापेक्षा चांगली ओपनिंग घेत, पहिल्या दिवशी देशभरात एकूण 130 कोटींचे कलेक्शन केले होते.
 
पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता 'RRR' चित्रपटाचे कलेक्शन दररोज 'बाहुबली 2' चित्रपटापेक्षा जास्त असेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दुस-या दिवशी 'आरआरआर' चित्रपटाची त्रेधातिरपीट उडाली.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मागे पडल्यानंतर, 'RRR' चित्रपटाने रविवारी पुन्हा वेग पकडला आणि त्या दिवशी त्याचे कलेक्शन 100.3 कोटी रुपये झाले.  'RRR' चित्रपटाचे मंगळवारपर्यंत नेट कलेक्शन 406 कोटी रुपये झाले आहे.