गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (09:15 IST)

Book Review - पुस्तक परिचय.... वंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका

लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, मानसिक, भावनिक वैचारिक बदला बद्दलची ही लघुनाटिका आहे.
 
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानले जाते परंतु काही धार्मिक पंडित म्हणवून घेणा-या व्यक्तीच्या मूळे लिंगभेद निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो आहे लिंगभेदामुळे अनेक नवनवीन वाद विवाद होत आहेत. पुरुषांना सर्व बाबतीत मुक्तता असते परंतु स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. भारतीय संस्कृती हि पुरुष प्रधान मनाली जाते परंतु कोणताही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे.
 
वंश आणि अंश या लघुनाटिकेमध्ये लेखकाने एका काल्पनिक विवाहात स्त्री पुरुषामध्ये लिंगभेदामुळे घटस्फोट घेण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात. त्या दोघांनाही घटस्फोट हवा असतो परंतु त्यांना तीन मुली असतात त्या मुलींच्या जोपासनेसाठी लागणारी पोटगी त्या महिलेला मिळावी यासाठी ते कोर्टात जातात. तेथे त्यास्रीला सर्वजण वंशाचा दिवा मानला जाणारा मुलगाच हवा आणि ते ती स्त्री देऊ शकत नाही म्हणून तिचा पती घटस्फोट घेत असतो. परंतु मुलं जन्माला घालणे हे फक्त एका स्त्रीचे काम नसून त्यामध्ये पुरुष देखील खुल महत्वाची भूमिका बजावत असतात. कोर्टा मध्ये काही जेष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती तसेच डॉक्टर यांना बोलावून मुलं जन्माला घालणे, त्यासाठी आवश्यक असणा-या गोष्ट या सर्व बाबींची चर्चा होते.
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्री मध्ये फक्त X पेशी असतात तर पुरुषामध्ये X आणि Y अशा दोन प्रकारच्या पेशी असतात पुरुषापासून मिळालेल्या पेशींनुसारच जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्री किंवा पुरुष ठरत असते त्यामुळे स्त्रियांना दोष देण्यापेक्षा पुरुष ही तितकाच जबाबदार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्री ही नेहमी जमिनीची भूमिका बजावते तर पुरुष हा शेतक-याची भूमिका बजावत असतो पुरुष जे पेरतो तेच उगवत असते मग पुरुषाने काय पेरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.
 
लेखक मनोहर भोसले यांनी मुलगा किंवा मुलगी या दोघात ही वंश न समजता तो आपला अंश आहे म्हणून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. असा मुक्त विचार सरणीचा संदेश खूप छान पद्धतीने दिला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ही लघुनाटिका सादर व्हावी आणि समाज जागृतीचे आणि प्रबोधनाचे कार्य होणे आवश्यक आहे आणि ते वंश आणि अंश या लघु नाटिकेतून नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. लेखकाला पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.