शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (11:35 IST)

श्री सर्वोत्तम दिवाळी विशेषांक २०२१ प्रसिद्ध

इंदूर प्रेस क्लबच्या राजेंद्र माथूर सभागृहात श्री सर्वोत्तम पब्लिकेशन्सच्या विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांत श्री संजय द्विवेदी, महासंचालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली, इंदूरचे खासदार श्री शंकर ललवाणी, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री कृष्णकुमार अस्थाना या मान्यवरांच्या हस्ते श्री सर्वोत्तम दिवाळी विशेषांक २०२१ चे प्रकाशन करण्यात आले. 
 
या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी मध्य प्रदेश संस्कृती परिषदेच्या साहित्य अकादमीचे संचालक डॉ. विकास दवे तसेच अलाउद्दीन खान संगीत व कला अकादमीचे संचालक श्री. जयंत भिसे या माननीय पाहुण्यांनीही हजेरी लावली. मराठी साहित्यांत दिवाळी विशेषांकाचे एक आगळे वेगळे महत्व आहे. इंदूर येथून गेल्या २२ वर्षांपासून नियमित प्रकाशित होणारे श्री सर्वोत्तम हे मध्य प्रदेशातील मराठी भाषेत प्रकाशित होणारे एकमेव नियतकालीन आहे. 
या प्रसंगी इंदूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री अरविंद तिवारी, स्वदेश पेपरचे व्यवस्थापकीय संचालक-संपादक श्री विवेक गोरे आणि श्री सर्वोत्तमचे प्रधान संपादक श्री अश्विन खरे उपस्थित होते.