सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (13:19 IST)

जाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत

बौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे. १. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवाद. 
 
१. अनिश्वरवाद- 
बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही. 
 
२. अनात्मवाद. 
अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ शकतो आणि अंधारात लीनही होऊ शकतो. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय आत्मवान होता येणार नाही. निर्वाणाच्या अवस्थेतच स्वत-ला जाणून घेता येते. मृत्यूनंतर आत्मा महासुसुप्तिमध्ये गायब होऊ शकतो. अनंतकाळ तो अंधारात पडून राहू शकतो वा लगेचचा दुसरा जन्म घेऊन पुन्हा एकदा जगरहाटीत येऊ शकतो. 
 
३. क्षणिकवाद- 
या ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आहे. नश्वर आहे. काहाही कायमस्वरूपी रहाणारे नाही. सगळे काही बदलत जाणारे आहे. शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे रथासारखे आहे. रथाचे घोडे, चाक व पालखी काढून घेतल्यास रथाला अस्तित्व उरणार नाही. तसेच शरीर व ब्रह्मांड परस्परांपासून दूर नेल्यास परस्पर अस्तित्वाला अर्थ उरणार नाही. 
 
वरील तीन सिद्धांत बौद्ध दर्शनाचा पाया आहे. या तीन सिद्धांतातूनच निरनिराळ्या विचारधारा प्रसव पावून सहा उपसंप्रदाय या धर्मात जन्माला आले.