शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (10:02 IST)

बुद्ध जयंती 2021: गौतम बुद्धांशी संबंधित 10 न ऐकलेल्या गोष्टी

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला कपिलवस्तु येथील राजा शुद्धोधन यांच्या घरी झाला. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा म्हणतात. त्यांच्या आईचं नाव महामाया देवी होतं. चला त्यांच्याबद्दलच्या 10 मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.
 
1. गौतम बुद्धांचे जन्म नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थच्या मावशी गौतमीने त्यांचे संगोपन केले कारण सिद्धार्थच्या जन्मानंतर सात दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले होते.
 
2. गौतम बुद्ध शाक्यवंशी छत्रिय होते म्हणून त्यांना शाक्यमुनी देखील म्हणायचे. एका मान्यतेनुसार शाक्यांच्या वंशावळीनुसार गौतम बुद्ध श्रीरामांचे पुत्र कुश यांच्या वंशात जन्मले होते. महाभारतात शल्य कुशवंशी होते व याच शल्यांच्या सुमारे 25 व्या पिढीतच गौतम बुद्धांचा जन्म झाला.
 
3. संशोधन असे दर्शवितो की जगातील बहुतेक प्रवचन बुद्धांचे होते. बुद्धाने जेवढे सांगितले आणि जितके सांगितले तितके दुसर्‍या कोणीही सांगितलेले नाही हे रेकॉर्ड आहे. पृथ्वीवर बुद्ध समान कोणी नाही. त्याच्या प्रवचनांनी भरलेली शेकडो ग्रंथ आहेत परंतु आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यात कोठेही पुनरावृत्ती नाही. बुद्धांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक उपदेश हे कौशल देशाच्या राजधानी श्रावस्ती येथे दिले. त्यांनी मगधला देखील आपलं प्रचार केंद्र बनवले. महात्मा बुद्धांनी आपले उपदेश पाली भाषा (मूळची मगधी) मध्ये दिले होते. असे म्हणतात की ते नियमितपणे उपवास करीत असत आणि सामान्यत: काही मैलांचा प्रवास पायी जात असत, जेणेकरून तो सर्वत्र ज्ञान पसरवणे असा उद्धेश असत.
 
4. अंगुत्तर निकाय धम्मपद अठ्ठकथा यानुसार वैशाली राज्यमध्ये तीव्र साथीचा आजार पसरला होता. मृत्यूचे तांडव सुरु होते. लोकांना प्राण कसे वाचवावे कळत नव्हते. चारीबाजूला केवळ मृत्यू दिसत होती. भगवान बुद्धांनी येथे रतन सुत्त उपदेश दिलं ज्याने ज्यामुळे लोकांचे आजार बरे झाले.
 
5. असे म्हणतात की एकदा बुद्धांना मारण्यासाठी वेडा हत्ती सोडण्यात आला होता परंतु हत्ती बुद्धांजवळ येऊन त्यांच्या चरणात बसून गेला. त्यांनी एकदा नदी पायी चालत पार केल्याची घटना देखील उल्लेखित आहे. या प्रकारे त्यांच्याद्वारे अनेक चमत्कार घडले असल्याची माहिती ‍दिली जाते.
 
6. गौतम बुद्धांना त्यांच्या बर्‍याच जन्माच्या आठवणी होत्या व त्यांना त्यांच्या भिक्षूंची अनेक जन्मांची माहिती होती. एवढेच नव्हे तर ते भिक्षूंना आपल्या आजूबाजूच्या प्राणी, पक्षी आणि वनस्पती इत्यादींच्या मागील जीवनाविषयी सांगायचे. जातक कथांमध्ये बुद्धांच्या सुमारे  549 मागील जन्मांविषयी वर्णन आहे.
 
7. वारणसीच्या जवळ सारनाथ येथे महात्मा बुद्द यांनी आपलं पहिलं उपदेश पाच पंडित, साधूंना दिले होते जे बौद्ध परंपरेत धर्मचक्रप्रवर्तन नावाने प्रसिद्ध आहे. महात्मा बुद्धांनी तपस्स व मल्लक नावाच्या दोन लोकांना बौद्ध धर्माचे सर्वप्रथम अनुयायी केले, ज्यांना शूद्र मानले जात असे. बौद्ध धर्म वर्ण व्यवस्था आणि जाति प्रथेला विरोध दर्शवतं.
 
8. 'माझा जन्म दोन शालच्या झाडांमध्ये झाला होता, म्हणून शेवटही दोन शालच्या झाडांमध्ये होईल. आता माझी शेवटची वेळ आली आहे.' आनंदला खूप दु:ख झालं. ते रडू लागले. बुद्धांना समजल्यावर त्यांना बोलावून म्हटले की, 'मी आपल्याला आधीच सांगितले होते की जी वस्तू उत्पन्न झाली आहे तिचा मृत्यू होतो. निर्वाण अनिवार्य व स्वाभाविक आहे. म्हणून रडतोस कशाला? बुद्ध यांनी आनंदला म्हटे की मी मेल्यावर मला गुरु म्हणून अनुसरण करू नकोस.
 
9. गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर लोक 6 दिवसांपर्यंत दर्शनासाठी येत राहिले. सातव्या दिवशी मृतदेहावर अत्यंत संस्कार केले गेले. मग त्याच्या अवशेषांसाठी मगधचा राजा अजातशत्रु, कपिलावस्तूच्या शक्य आणि वैशालीचा विच्छावासींमध्ये भांडण झाले. जेव्हा वाद शांत झाला नाही तेव्हा द्रोण नावाच्या ब्राह्मणाने तडजोड करत निर्णय दिला की अवशेष आठ भागात विभागले पाहिजेत. असेच झाले. आठ स्तूप आठ राज्यांमध्ये तयार करुन अवशेष ठेवण्यात आले. असे म्हटले जाते की नंतर अशोकाने त्यांना बाहेर काढून 84000 स्तूपात विभागले. गौतम बुद्धाच्या अस्थिंच्या अवशेषांवर भट्टी (द.भारत) मध्ये निर्मित प्राचीन स्तुपाला महास्तूप म्हणतात.
 
10. भगवान् बुद्धांनी भिक्षुंच्या आग्रहावर त्यांना वचन दिले होते की मी 'मैत्रेय' मधून पुन्हा जन्म घेईन. त्यानंतर 2500 पेक्षा जास्त वर्षे गेली आहेत. असे म्हणतात की दरम्यान बुद्धांनी जन्म घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणे अशी होती की त्यांना जन्म घेता आला नाही. शेवटी, थिओसोफिकल सोसायटीने जे.डी. कृष्णमूर्तीच्या आत
 
त्याच्या अवतरणासाठी सर्व व्यवस्था केली होती, परंतु तो प्रयत्नही अयशस्वी ठरला. नंतर ओशो रजनीश यांनी देखील त्यांना आपल्या शरीरात अवतरित होण्याची परवानगी दिली होती. त्या दरम्यान जोरबा दी बुद्धा नावाने प्रवचन माळ ओशो यांनी केली.
 
हा योगायोग किंवा नियोजन आहे की बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी जंगलात 563 ईसापूर्व झाला होता. त्यांची आई त्याच्या माहेरी देवदह जात असताना  कपिलवस्तु व देवदह यांच्यामध्ये नौतनवा स्थानकापासून 8 मैल दूर पश्चिममध्ये रुक्मिनदेई नावाच्या जागेवर त्याकाळी लुम्बिनी वन होतं तेथे पुत्राला जन्म दिला. याच दिवशी पौर्णिमेला 528 ईसापूर्व त्यांना बोधगया मध्ये एका वृक्षाखाली सत्य काय आहे याचे ज्ञान प्राप्त झाले व याच दिवशी 483 ईसापूर्व 80 वर्षाच्या वयात त्यांनी कुशीनगरमध्ये जगाचा निरोप घेतला.