मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2017-2018
Written By

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी केंद्र सरकार ‘आर्थिक पाहणी ‘ अहवाला संसदेत सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत. नोटाबंदीच्या पार्श्वभूमिवर हा अर्थसंकल्प जेटलींसाठी कसरतच ठरणार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संबोधित करणार आहेत. नोटाबंदीमुळे जनतेला सोसावे लागलेले प्रचंड हाल लक्षात घेता अर्थसंकल्प सादर करणे अर्थमंत्र्यांपुढे आव्हानच ठरणार आहे. शेती, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, सर्वसामान्यासांठी गृहकर्जबाबत भरीव निधी प्रस्तावित करण्याची अपेक्षा आहे.