बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:55 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सोबतच आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात येईल. तर केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त रविवारी केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदीविधेयक संमत करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेत विरोधकांनी त्यात सुधारणा सुचवल्या आहेत. या विधेयकाच्या मंजुरीसाठी एकमत साधण्याचा केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करेल, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. वस्तू व सेवा कराचे विधेयकही सर्व पक्षांचे एकमत झाल्यावरच संमत करण्यात आले. त्याचप्रमाणे तिहेरी तलाकबंदी विधेयकही संसदेत संमत केले जाईल. 

महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार तसेच, घटनात्मक दर्जा असलेल्या संस्थांवर होणारे हल्ले, व्यापाऱ्यांच्या समस्या, उत्तर प्रदेशातील हिंसाचाराच्या घटना आदी विषयांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारला जाब विचारला जाईल, असे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ९ फेब्रुवारी रोजी संपेल. त्यानंतर ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात अर्थसंकल्प संमत केला जाईल.