मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 84 टक्के पालकांची सहमती?
15 जुलैपासून राज्यातील कोव्हिड-मुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने (SCERT) सर्वेक्षण केले असून त्यानुसार 84 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे.
यासाठी राज्यातील सव्वा दोन लाख पालकांनी आपली मते नोंदवली असून यापैकी 84 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
आठवी ते बारावीप्रमाणेच इतर इयत्ता सुद्धा सुरू करण्याबाबत पालकांचे मत जाणून घेण्यासाठी एससीईआरटी हे सर्वेक्षण करत आहे. हे सर्वेक्षण 12 जुलैपर्यंत सुरू राहणार असून पालक ऑनलाईन माध्यमातून आपले मत नोंदवू शकणार आहेत.