Career In Fine Art Photography:आज प्रत्येकाला नोकरी हवी असते, पण प्रत्येकाला आपली आवडती नोकरी करण्याची संधी मिळत नाही. फोटोग्राफी हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये प्रत्येकाला करिअर करायचे असते, पण त्यात काही लोकच यशस्वी होतात. फोटोग्राफी ही एक कला आहे या साठी सराव आणि चिकाटी लागते. एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तुचे छायचित्र व्हिज्यूलाईज करू शकतात. आजच्या काळात, जाहिरात आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे फोटोग्राफीच्या क्षेत्रात नोकरीच्या पर्यायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वात जास्त पैसा फॅशन आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफर बनण्यात आहे, यामध्ये तुम्ही साहसाने महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
पात्रता-
फोटोग्राफीसाठी ज्यांना पॅशन आहे त्यांना कोणत्याही पात्रतेची गरज नाही, पण त्यानंतरही जर तुम्हाला त्यासाठी प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर बारावीनंतर त्यातील अनेक कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन प्रोफेशनल फोटोग्राफी शिकता येते.
बारावीनंतर फोटोग्राफीचे अनेक प्रकारचे पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत त्यात प्रवेश घेता येतो. बारावीत यश मिळवल्यानंतर बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स कोर्स करून पदवी मिळवू शकता. हा संपूर्ण कोर्स करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांचा कालावधी द्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी सोबतच चांगले लेखन शिकवले जाते. याशिवाय फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरुन फोटोग्राफी कौशल्य अधिक वाढवता येईल.
अभ्यास क्रम -
डिप्लोमा इन डिजिटल फोटोग्राफी
सर्टिफिकेट इन कॅमेरा अँड फोटोग्राफी
B.A. in व्हिज्युअल आर्टस् अँड फोटोग्राफी
सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी
डिप्लोमा इन फोटोग्राफी
सर्टिफिकेट इन प्रोफेशनल फोटोग्राफी
सर्टिफिकेट इन अडवान्सड फोटोग्राफी अँड फोटो जर्नालिझम
B.A. (Hons) कम्युनिकेशन डिझाईन – फोटोग्राफी
फायदे-
* छायाचित्रकार असल्याने तुम्हाला नवीन ठिकाणी फिरण्याची संधी मिळते.
* छायाचित्रण हे एक सर्जनशील करिअर आहे आणि ते व्यक्तीची सर्जनशील कौशल्ये विकसित करते.
* लोकप्रिय आणि अत्यंत कुशल छायाचित्रकाराला भारतात जास्त पैसे दिले जातात.
*जर तुम्ही एक कुशल छायाचित्रकार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केल्यास भरपूर पैसे कमावू शकता.
व्याप्ती-
1 फोटो जर्नलिस्ट -
सामाजिक समस्या कव्हर करणार्या आणि विविध वर्तमानपत्रांना पाठवणार्या फोटोग्राफर्सना फोटो जर्नलिस्ट म्हणतात. हे पत्रकार फ्रीलांसर म्हणूनही काम करू शकतात.
2 इव्हेंट फोटोग्राफर-
हे फोटोग्राफर समारंभ, लग्न, काही उत्पादनांचे लाँचिंग, सेलिब्रेशन इत्यादी कोणताही कार्यक्रमात फोटोग्राफी करतात. हजारो लोकांसोबत मोठ्या समारंभाचे चे छायाचित्रण करण्यात हे छायाचित्रकार अनुभवी असतात.
3 वाईल्डलाईफ फोटोग्राफर -
जे विविध चॅनेल्स आणि मासिके यांच्याशी निगडीत असतात आणि वन्यजीवांचे विविध पैलू कव्हर करतात त्यांना वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणतात. हे छायाचित्रकार विविध प्रकारचे पक्षी, प्राणी इत्यादींचे फोटो काढण्यासाठी ओळखले जातात.
4 फॅशन फोटोग्राफर-
जे छायाचित्रकार मॉडेल्सचे फोटो घेतात आणि कॅमेऱ्यात एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य पाहतात त्यांना फॅशन फोटोग्राफर म्हणतात. हे छायाचित्रकार स्टुडिओ आणि बाहेरच्या ठिकाणीही काम करतात.
5 जाहिरात छायाचित्रकार
जाहिरात एजन्सीमध्ये काम करणारे छायाचित्रकार जे एखाद्या विशिष्ट जाहिरातीसाठी छायाचित्रे घेतात त्यांना जाहिरात छायाचित्रकार म्हणतात. त्यांचे काम जाहिरातीच्या चित्रांवर क्लिक करणे आहे.
6 एरिअल फोटोग्राफर -
हे छायाचित्रकार ,बातम्या, व्यवसाय, ओद्योगिक , शास्त्रज्ञ किंवा लष्करी उद्देशांसाठी नैसर्गिक आपत्ती, युद्ध, किंवा तत्सम परिस्थितीतील ठिकाणांचे इमारती, लॅन्डस्कॅप क्षेत्रांची विमान उड्डाणातून हवाई छायाचित्रे घेतात.
7 कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर-
कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफरचे कार्य एका ठराविक कंपनी किंवा कारखान्यासाठी चालत असते. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामे त्यांना करावी लागतात. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यामातून जनतेला माहिती करून देणे, हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य कार्य असते.
8 मॅक्रो फोटोग्राफर -
अतिशय लहान वन्य प्राणी, छोटी फुले इत्यादींची छायाचित्रे घेतली जातात. लहान कीटक किंवा फुलांचे अतिशय जवळून सुंदर असे फोटो घेतले जातात. मॅक्रो फोटोग्राफीच्या साहाय्याने समुद्रातील प्राण्यांची छायाचित्रेही काढली जातात.
9 फूड फोटोग्राफी -
गेल्या काही वर्षांत फूड फोटोग्राफी खूपच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियाचा वापर जसा जसा अधिक वाढत गेला आहे त्याच प्रमाणात फूड फोटोग्राफी देखील अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. एखाद्या हॉटेल ची जाहिरात करताना किंवा हॉटेलची मेनू लिस्ट तयार करताना फूड फोटोग्राफी चा वापर केला जातो.
फूड फोटोग्राफीमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो काढले जातात आणि नंतर वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या मदतीने त्यांची जाहिरात आणि विक्री केली जाते. हल्ली अनेक लोक स्वतःच्या सोशल मीडिया वर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो पोस्ट करत असतात.
छायाचित्रकाराचा पगार
छायाचित्रकाराचा पगार त्याच्या विषयावर अवलंबून असतो, जर तो सामान्य छायाचित्रकार असेल तर तो महिन्याला 10 ते 30 हजार रुपये कमवू शकतो, तर जर तो फॅशन किंवा वाईल्डलाईफ फोटोग्राफर असेल तर तो महिन्याला लाखो ते कोटी रुपये कमवू शकतो. तो कोणत्या स्तरावर फोटो काढू शकतो यावर अवलंबून आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठ -
* फर्ग्युसन कॉलेज, पुणे
* सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई
* एजेके मास कम्युनिकेशन सेंटर, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
* दिल्ली स्कूल ऑफ फोटोग्राफी, दिल्ली
* फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे
* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी, मुंबई
* इंडियन इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट इन एज्युकेशन अँड अॅडव्हान्स स्टडीज, अहमदाबाद