शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

Polytechnic Computer Science Engineering Course - 10 वी 12 वी नंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग कोर्स करा पात्रता, अर्ज प्रक्रिया, फी, व्याप्ती आणि अभ्यासक्रम जाणून घ्या

Polytechnic Computer Science Engineering Course 2022:पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग हा DCSE म्हणून ओळखला जाणारा 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी AICTE मान्यताप्राप्त पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवार 10वी किंवा 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निकसाठी पात्र आहेत . 
 
पॉलिटेक्निकमधील संगणक विज्ञान अभियांत्रिकी हा भारतातील डिप्लोमा आधारित अभ्यासक्रम आहे जो पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 वर्षे लागतात. तथापि, पॉलिटेक्निक संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये, विद्यार्थी सी, सी++, सी#, एचटीएमएल, जावास्क्रिप्ट आणि इतर संबंधित विषयांसारख्या संगणक प्रोग्रामिंग भाषांचे मूलभूत ज्ञान सिद्धांत आणि व्यावहारिक माध्यमातून प्राप्त करतात.
 
संगणक विज्ञान अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा करिअर घडवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असून डिप्लोमा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची ओढ वाढत आहे. जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करिअर बनवण्यास तयार असाल, तर कॉम्प्युटर  सायन्स इंजिनीअरिंग कोर्स 10 वी आणि 12 वी नंतर केला जाणारा योग्य कोर्स आहे.
 
प्रवेश पात्रता
• किमान पात्रता - 10वी / 12वी / ITI मध्ये - 50% उत्तीर्ण असावे 
• प्रवेश प्रक्रिया - प्रवेश परीक्षा
• फी - रु. 30000*/- प्रतिवर्ष (शुल्क महाविद्यालयानुसार बदलू शकतो)
• अभ्यासक्रमाचा प्रकार- डिप्लोमा
 
पॉलिटेक्निक संगणक विज्ञान अभियांत्रिकी महाविद्यालये
1. पुसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
2. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी
3. जीडी गोयंका युनिव्हर्सिटी (डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग), गुडगाव, दिल्ली एनसीआर
4. यमुना ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, चंदीगड
5. सरकारी पॉलिटेक्निक मुंबई
6 GLA युनिव्हर्सिटी, मथुरा, उत्तर प्रदेश
7 श्री भागूभाई मफतलाल पॉलिटेक्निक, महाराष्ट्र
8. देश भगत युनिव्हर्सिटी, पंजाब
9. रयात इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पंजाब
10. टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटी, कोलकाता डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग 
 
 अर्ज कसा करावा-
डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कॉलेज ते कॉलेज बदलते. मानक प्रवेश प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे:
 
* प्रवेशासाठी अर्ज सादर करा.
*प्रवेश परीक्षा द्यावे.
* अपेक्षित कट ऑफमध्ये गुण मिळवा.
* समुपदेशन फेरीत सहभागी व्हा.
* सीट फ्रीझ करा, शैक्षणिक फी भरा
* पूर्ण दस्तऐवजद्या 
* कोर्समध्ये यशस्वी नोंदणीची खात्री करा.
 
पॉलिटेक्निक कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग कोर्समध्ये स्कोप-
कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमा केल्यानंतर तुमच्या करिअरसाठी अनेक नवीन मार्ग खुले होतात. 
वेब डिझायनर,
 वेब डेव्हलपर, 
प्रोग्रामर,
UI डेव्हलपर
 यासारख्या पदांसाठी तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीत अर्ज करू शकता.