शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (09:52 IST)

मासेमारीच्या व्यवसायात करिअरच्या भरपूर संधी

भारतभरात मासेमारी एक सुप्रसिद्ध व्यवसाय आहे. हे शेतीशी संबंधित असल्याचे दिसून येते. परंतु प्रत्यक्षात हा व्यवसाय फार प्रगत आणि फायदेशीर व्यवसाय आहे. सध्या कोरोनाच्या विषाणूंमुळे मोठ्या प्रमाणात गावाकडे लोक गेले आहेत. बऱ्याच लोकांना रोजगाराच्या समस्येला सामोरी जावे लागले, कारण जमलेले व्यवसाय किंवा शहरातील नोकरी सुटल्यामुळे लोकांचे पाय आपल्या गावाकडे वळले आहे. गावात लोकांकडे शेती करण्यासाठी जमिनी कमी किंवा अधिक असतात त्यामुळे मासेमारी त्यांच्या साठी एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. चला जाणून घेऊ या काही मूलभूत गोष्टी.
 
* तलाव व्यवस्थित करा -
बऱ्याच वेळा लोक तलाव खणल्यावर लगेचच माशांचे बियाणं घालतात. पण ही पद्धत योग्य नाही. सर्वप्रथम तलावाची स्वच्छता केल्यावर त्यामध्ये 200 किलो प्रति हेक्टरने चुन्याची फवारणी करणे आवश्यक आहे. या शिवाय महुआ खळी आणि ब्लिचिंग पावडर घातल्याने मासेमारीसाठी तलाव चांगल्या प्रकारे तयार होत. हे सर्व काम हिवाळ्यातच करावं. जेणे करून हिवाळ्याचा काळ जाई पर्यंत मासे टाकण्या योग्य तलाव तयार होईल. 
तसेच तलावात ढैंचा नावाचे गवत लावतात जेणे करून ते खताचे काम देऊ शकेल. हे मासेमारीसाठी उपयुक्त आहे. हे तलावात 40 किलो प्रति हेक्टरच्या हिशोबाने तलावात पेरतात तसेच शेणखत देखील घालतात ज्यामुळे वनस्पती वाढते. जर गवताला वाढ नाही तर शेणासह सुपर फास्फेट आणि युरियाचे घोळ तलावात टाकणे फायदेशीर होऊ शकत. 
 
हे काम माशांचे बियाणं टाकण्यापूर्वीच करावं. माशांचे बियाणं घातल्यावर खत टाकणे धोका दायक असू शकत. 
हे काम केल्यावर कमीत कमी 1 महिन्यानंतर तलावात पाणी भरून हिवाळ्याचा हंगाम गेल्यावरच माशाचे बियाणं घाला. तसेच तलावाच्या पाण्याची गुणवत्ता आणि त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असावे. या साठी सजग राहणे आवश्यक आहे. 

* माशांच्या प्रजातींकडे लक्ष द्या- 
जरी माशांसाठी तलाव सज्ज झाले आहे पण त्यामध्ये माशाचे बियाणे योग्यरीत्या घातले नाही तर हे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. 

लोक प्रामुख्यानं गावरान किंवा देशी आणि परदेशी माशांची प्रजातीचं टाकतात. या मध्ये गावरान किंवा देशी मध्ये रोहू, कतला, मृगळ या प्रजाती आहे. तर परदेशी मास्यांमध्ये सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प इत्यादी आहेत. बरेच लोक बाजारातून मासे आणल्यावर त्यांना एक किंवा दोन टक्के मीठाच्या घोळात काही वेळ ठेवतात, जेणे करून माशाचा बियाण्यात काही आजार असतील तर त्याचा प्रभाव कमी होईल. 
 
हे जास्त वेळ ठेवू नये आणि 2 ते 3 मिनिटानंतर मासे तलावात टाकावे. लक्षात ठेवा की माशाचे प्रमाण तलावात कमी किंवा जास्त असू नये. योग्य प्रमाणातच मासे बियाणे घालावे. जर एक किंवा दोन मासे तलावात मरत असतील तर त्यांना त्वरितच तलावांमधून बाहेर काढून टाका. आणि वेळोवेळी बियाणे वाढवून त्याची तपासणी करावी असं केल्यानं काहीही नुकसान होण्यापासून वाचू शकतो. 
 
माशांना कोणत्याही विशिष्ट चाऱ्याची गरज नसते,विशेषतः तेव्हा जेव्हा आपला तलाव जुना आहे. पण तांदुळाचं पीठ आणि शेंगदाण्याची खळी हे माशांची वाढ करते. या शिवाय प्रथिन, कार्बोहायड्रेट आणि चरबीने समृद्ध चाऱ्याचे प्रमाण माशासाठी योग्य प्रमाणात असावे. याची जाणीव ठेवा. लक्षात ठेवा की बियाणे चांगल्या प्रतचे असावे. आणि त्याचे प्रमाण देखील योग्य असावे. अन्यथा माशांची वाढ योग्य प्रकारे होणार नाही.
 
* बाजाराला समजणे महत्त्वाचे आहेत -
जेव्हा आपल्या कडे माशांचे बियाणे तयार होतात तर आपल्या सभोवतालच्या बाजाराचा अभ्यास करावा आणि बघा की बाजारात सध्या कोणत्या माशाची मागणी जास्त आहे. लोक जास्त काय खरेदी करतात.
 
अशा परिस्थितीत आपण माहिती घेण्यासाठी बाजारपेठेत ग्राहक बनून जावे आणि माशांची प्रजाती पासून त्यांच्या किमतीची माहिती घेऊ शकता. त्यानुसार आपण व्यवसायाची रणनीती बनवा. जर बाजारात मोठ्या माशांची मागणी जास्त आहे तर तलावात कमी माशांचे बियाणं असावे, आणि जर बाजारपेठेत लहान माशांची मागणी जास्त आहे तर जास्त प्रमाणात बियाणे टाकणे देखील फायदेशीर ठरेल.
 
एकंदरीत योग्य वेळी मासे विकणे आणि योग्य व्यापाऱ्यांशी संपर्क साधल्यास आपल्याला फायदा देऊ शकतात. बऱ्याच वेळा  व्यापारी आपल्या तलावात येतात आणि सर्व मासे स्वतःहून खरेदी करतात. 
दरात जास्त अंतर असल्यावर आपण स्वतःच मासे बाजारात पोहोचवू शकता. 
 
या शिवाय काही गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचे आहे जसे की माशांची ग्रेडिंग करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्या तलावात काही मासे अधिक मोठे आहे आणि काही मासे अधिक लहान असेल तर मोठे माशे काढून दुसऱ्या तलावात ठेवा किंवा त्यांना बाजारात पाठवून द्या, कारण मोठ्या माशांचा आहार अधिक असेल आणि त्या लहान माशांचे अन्न देखील खाऊन जातील. म्हणून माशांची ग्रेडिंग करणे आवश्यक आहे. जेणे करून माशांचा वाढीत सातत्यता राहील. तसेच माशांचा अंतर्गत आणि बाह्य रोगांबद्दल सज्ज राहा असं केले नाही तर आपल्याला कळणारच नाही की आपले भांडवल कधी मोठ्या नुकसानीत बदलतील.
या शिवाय वेगवेगळ्या माध्यमातून नवीन नवीन माहिती घेत राहावी. आणि मासे उत्पादकांच्या संपर्कात राहावे. जेणे करून आपल्याला नवीन गोष्टी कळतील.