शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (09:28 IST)

सरकारी नोकरी : UPSC ची CISF मध्ये भरती साठी अधिसूचना जारी

युनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) ने सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF) मध्ये सहाय्यक कमांडंट(कार्यकारी) यांच्या पदावर भरती करण्यासाठीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 डिसेंबर पासून सुरू झाली असून 22 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. UPSC ने अधिसूचनेत रिक्तपदांची संख्या जाहीर केली नाही. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in  जाऊन अधिकृत तपासणीवर शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
 
या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय वर्ष 35 पेक्षा जास्त नसावे. मात्र एससी, एसटी,उमेदवारांना वयाच्या मर्यादेमध्ये पाच वर्षाची सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड शारीरिक मानक चाचणी फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट,किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणी फिजिकल एफिशिएन्सी टेस्ट, आणि वैद्यकीय चाचणी म्हणजेच मेडिकल टेस्ट नंतर लेखी परीक्षा या आधारे केली जाईल. या शिवाय उमेदवारांकडे शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
 
31 डिसेंबर पर्यंत पाठवायची अर्जाची प्रत-
या पदांसाठी लेखी परीक्षा मध्ये दोन पेपर होतील. पेपर 1 मध्ये सामान्य क्षमता, बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक कौशल्ये समाविष्ट असतील. पेपर 2 मध्ये निबंध, पॅसेज रायटिंग आणि कॉम्प्रेहेन्शन असतील. उमेदवाराला संपूर्ण अर्ज पत्र फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंटिंग प्रत टपाल च्या माध्यमाने खालील दिलेल्या पत्त्यावर 31 डिसेंबर पूर्वी पाठवावे लागेल.
 
पत्ता -
महानिदेशक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, 13, CGO कॉम्प्लेक्स, लोदी रोड , नवी दिल्ली -110003