सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (13:26 IST)

career tips : बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा, फायदेशीर ठरेल

एक काळ असा होता की बारावी केल्यानंतर विद्यार्थ्यांना फारसा पर्याय नसायचा आणि कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडायचा या विचाराने ते टेन्शनमध्ये असायचे, जे त्यांचे भविष्य घडवण्यास मदत करू शकेल. पण आता तसे नाही. आता बारावीनंतर विविध अभ्यासक्रम आहे आणि पर्याय देखील बरेच आहेत. ज्यामधून विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि व्याप्तीनुसार निवड करू शकतात. पण निवड करताना विद्यार्थ्यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की ज्या अभ्यासक्रमाची त्यांनी निवड केली आहे. तो अभ्यासक्रम त्यांच्यासाठी फायदेशीर आहे किंवा नाही. अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1- सर्वप्रथम, तुम्ही निवडत असलेल्या कोर्सचे तोटे आणि फायदे काय आहेत ते पहा. म्हणजेच भविष्यात तो कोर्स तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल ते पहा.
 
2 अभ्यासक्रमांबाबत विविध प्रकारच्या जाहिराती आणि मोहिमा राबवल्या जातात. मात्र विद्यार्थ्यांनी जाहिरातींना भुलून न पडता. सखोल चौकशी करूनच अभ्यासक्रम निवडावा.
 
3 अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी त्यांची आवडही लक्षात ठेवावी. इंजिनीअरिंग आणि आयटीची वाढती मागणी पाहता तुम्ही त्यातच करिअर करण्याचा विचार करत असाल, पण तुम्हाला या दोन्ही क्षेत्रांमध्ये रस नसेल तर या क्षेत्रात जाण्याची चूक अजिबात करू नका.
 
4 मित्रांनी किंवा इतर विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून कोणताही अभ्यासक्रम किंवा नोकरी निवडू नका.अभ्यासक्रम किंवा संस्था निवडताना, त्याची मान्यता, विद्याशाखा आणि प्लेसमेंट कामगिरीची खात्री करून घ्या. अन्यथा आपली फसवणुक होऊ शकते.  
 
5 आपण अभ्यासक्रम कोणाच्याही दबावाखाली येऊन निवडू नका. आपली इच्छा कशा मध्ये करिअर करण्याची आहे ते समजूनच अभ्यासक्रमाची निवड करा. 
 
या पर्यायांची आपण 12 वी नंतर निवड करू शकता -
 
1 व्यावसायिक अभ्यासक्रम
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे स्वतःचे आकर्षण असते. विद्यार्थ्यांना हवे असल्यास ते बारावीनंतर हे अभ्यासक्रम निवडू शकतात. त्यांना हवे असल्यास ते आयटी आणि मॅनेजमेंटशी संबंधित कोणताही कोर्स करू शकतात. बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीए), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा, बॅचलर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (बीआयटी), प्रमोशन आणि सेल्स मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, फॅशन डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन्स असे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, ज्यांना खूप मागणी आहे. ही अशी क्षेत्रे आहेत ज्यात नोकरीला भरपूर वाव आहे.
 
2 संरक्षण सेवा
देशासाठी काही करायचे असेल, तर त्यासाठीही विविध अभ्यासक्रम आहेत. जसे की राष्ट्रीय संरक्षण सेवा. अनेक शाळा अकरावीपासूनच एनडीए परीक्षेची तयारी सुरू करतात. बारावीच्या वर्गातही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. क्लिअर झाल्यानंतर, तुमचे थेट प्रशिक्षण आणि NDA मधील संबंधित अभ्यास सुरू होतो.
 
3 वैद्यकीय क्षेत्रात वाव
जर विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ते 12वी नंतर नामांकित संस्थेतून बीएस्सी (पास) किंवा बीएससी (ऑनर्स) करू शकतात. आजकाल बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांमध्येही ग्रॅज्युएशन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 12वी नंतर तुम्ही अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम देखील करू शकता. मात्र यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 
4 वाणिज्य आणि संगणक विज्ञानाची वाढती मागणी
वाणिज्य क्षेत्रातही अनेक पर्याय आहेत, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीतून निवड करू शकतात. या प्रवाहातील विद्यार्थी भविष्यात एमबीए, सीएस, सीए, फायनान्शिअल अॅनालिस्ट अशा क्षेत्रात सोनेरी करिअर करू शकतात. संगणक विज्ञान अभ्यासक्रमांची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक महाविद्यालये बीएससी (ऑनर्स) संगणक विज्ञान अभ्यासक्रम देतात. हा कोर्स केल्यानंतर करिअरच्या पर्यायांची कमतरता भासत नाही.
 
5 कलांचेही वर्चस्व आहे
इतर प्रवाहांच्या तुलनेत अनेक विद्यार्थी आणि पालक कलेला कमी लेखत असले, तरी सत्य हे आहे की कलेच्या क्षेत्रातही अपार वाव आहे. कला शाखेचे विद्यार्थी 12वी नंतर नागरी सेवांसाठी तयारी करू शकतात. पूर्वी लोकांचा समज होता की कलाक्षेत्रात फारशा शक्यता नाहीत, पण आज त्यात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कला शाखेत असे अनेक विषय आहेत, ज्याचा अभ्यास करून तुम्ही सरकारी आणि खाजगी क्षेत्रात चांगले स्थान मिळवू शकता. तुम्ही अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयात पदवी मिळवू शकता. कला शाखेतील पदवीनंतर तुम्ही नागरी सेवांमध्ये जाऊ शकता. याशिवाय एमबीए, जर्नालिझम, मार्केट अॅनालिसिस, टीचिंग, एन्थ्रोपोलॉजी, ह्युमन रिसोर्स, एमएसडब्ल्यू असे अनेक पर्याय निवडू शकता.