बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (09:30 IST)

चाणक्य नीती : यशस्वी झाल्यावर या गोष्टी विसरू नका

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचे आजच्या काळात देखील औचित्य आहेत. चाणक्याची नीती माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. नीतिशास्त्रातील या गोष्टींना आपल्या आयुष्यात समाविष्ट केले तर जीवनाला यशस्वी आणि आनंदी बनवू शकता. यशाच्या संदर्भात चाणक्य नीती म्हणते की यश मिळवणे जेवढे कठीण आहे त्यापेक्षा कठीण आहे यशाला कायम राखणे त्याला टिकवून ठेवणे. यश मिळाल्यावर देखील काही गोष्टींना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा यश जास्त काळ टिकून राहत नाही. चला तर मग जाणून घेऊ या की यशस्वी बनून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 
 
1 मनात अहंकाराचे भाव येऊ देऊ नका -
माणसाला नेहमी आपल्या संघर्षाच्या काळाला स्मरले पाहिजे.काही लोकांमध्ये यशस्वी झाल्यावर अहंकाराचे भाव येतात. ज्यामुळे ते इतर लोकांचा सन्मान करत नाही नेहमी त्यांना अपमानित करतात. अशा लोकांचे यश जास्त काळ टिकत नाही. म्हणून यशस्वी झाल्यावर अहंकार करू नये.
 
 
2 स्वभावाला सभ्य आणि वाणीतील गोडवा राखून ठेवा -
यशस्वी झाल्यावर माणसाला आपल्या वाणीत गोडवा टिकवून ठेवायला पाहिजे, जेणे करून दुसऱ्यांच्या भावनेला दुखावता कामा न ये. नेहमी इतरांच्या भावनेचा सन्मान करा. स्वभावाने नम्र असणारे लोक सर्वांना आवडतात. स्वभावात नम्रता आणि वाणीत माधुर्यता हे यशस्वी लोकांचे गुण आहे.
 
3 मानवाच्या हितासाठी काम करावे- 
जर आपण स्वतः यशस्वी आहात आणि समाजाच्या हितासाठी कार्य करण्यात सक्षम आहात, तर मानवाच्या हितासाठीचे कार्य करावे.जे लोक मानवाच्या हितासाठी कार्य करतात त्यांना आयुष्यात यशासह समाजात मान प्रतिष्ठा मिळते. नेहमी स्वतः यशस्वी होण्यासह इतरांना देखील यशस्वी होण्यासाठी प्रवृत्त करावे.