रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (15:45 IST)

चाणक्य नीती: या 3 गोष्टींसाठी संकोच बाळगू नका

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित विविध पैलूंवर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चाणक्य म्हणतात की मानवाला नेहमी संयम राखूनच काम करावे, पण त्यांनी नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांच्या मध्ये अजिबात संकोच बाळगू नये. चाणक्य म्हणतात की या कामात संकोच केला तर व्यक्तीला नुकसान होऊ शकते. पण या कामात संकोच न करणारे व्यक्ती यशस्वी होतात. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यांच्या साठी संकोच बाळगू नये.
 
1 पैशाच्या संबंधित प्रकरणांमध्ये अजिबात संकोच करू नये.
चाणक्य म्हणतात की मनुष्याला पैशाच्या बाबतीत अजिबात संकोच करू नये. जे लोक पैशाचा बाबतीत संकोच करतात त्यांना तोटा होण्याची शक्यता असते. एखाद्याला पैसे उसने दिले असतील तर त्याच्या कडून मागायला संकोच करू नये. तसेच जर आपण व्यवसाय करीत आहात तर त्यामध्ये देखील स्पष्ट राहा अन्यथा पैशाचा तोटा संभवतो.
 
2 गुरू कडून ज्ञान घेताना देखील संकोच करू नये -
चाणक्य नीती म्हणते की गुरू कडून शिक्षण घेताना कधीही लाज बाळगू नये. मनात एखादा प्रश्न पडल्यास किंवा कोणतेही  मंत्र किंवा गोष्ट समजत नसेल तर ते त्वरितच विचारावे. केवळ एक जिज्ञासू व्यक्तीच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून ज्ञान प्राप्त करत. जे लोक शिक्षण घेताना कोणतीही लाज बाळगतात त्यांना पूर्ण ज्ञान मिळत नाही ज्यामुळे त्या लोकांना आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरी जावं लागत.
 
3 खाण्याच्या बाबतीत संकोच करू नये -
चाणक्य म्हणतात की माणसाने जास्त अन्न खाऊ नये.पण जेवताना कोणत्याही प्रकारचे संकोच करू नये.काही लोकांना इतरांच्या समोर जेवायला किंवा कोणाच्या घरी खायला संकोच होतो अशा परिस्थितीत ते उपाशी राहतात. शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, जी केवळ अन्नाद्वारे मिळते. उपाशी राहून मेंदूवर नियंत्रण ठेवले जात नाही, त्यामुळे आपण कोणतेही काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही. म्हणून जेवण करताना कोणत्याही प्रकारचा संकोच करू नये.