शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चाणक्य नीती: या 6 गोष्टींमुळे जीवनात कधीच अपयशी ठरणार नाही

1. मेहनत केल्याने दारिद्र्य दूर होतं, धर्म पाळल्याने पाप टिकत नाही, मौन राहिल्याने कलह होन नाही आणि जागृत राहिल्याने भय वाटत नाही. 
 
2. संसार एक कडू वृक्ष आहे ज्याचे दोन फळंच गोड असतात- एक मधुर वाणी आणि दुसरं सज्जनांची सुसंगतता.
 
3. ब्राह्मणांचे बल विद्या आहे, राजांचे बल त्याची सेना, वैश्यांचे बल त्यांचे धन आणि शूद्रांचे बल दूसर्‍यांची सेवा करणे आहे. ब्राह्मणांचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्या ग्रहण करावी. राजाचे कर्तव्य आहे की त्याने सैनिकांद्वारे आपलं बल वाढवावं. वैश्यांचे कर्तव्य आहे की व्यापार-व्यवसायाद्वारे धनवृद्धी करणे आणि शूद्रांचे कर्तव्य श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे. 
 
4. ज्या व्यक्तीचा पुत्र त्यांच्या सांगण्यात असतो, ज्याची पत्नी आज्ञानुसार आचरण करते आणि जी व्यक्ती स्वत: कमावलेल्या धनाने पूर्णपणे संतुष्ट असते अशा लोकांसाठी संसारच स्वर्गासमान आहे. 
 
5. सुखी गृहस्थाची ओळख, ज्याची संतान आज्ञाधारक असेल. वडिलांचे देखील कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन व्यवस्थित रित्या करावे तसेच विश्वास करता येणार नाही अश्यांना मित्र म्हणणे चुकीचे ठरेल आणि जिच्याकडून सुख प्राप्ती होत नसेल ती पत्नी व्यर्थ आहे. 
 
6. जे मित्र समोर गोड बोलतात पण पाठ वळताच आपल्या कार्यात अडथळे निर्माण करतात त्यांचा त्याग करणेच योग्य आहे. चाणक्य म्हणतात की असा मित्र त्या भांड्यासारखा आहे ज्यातील वरील भागात तर दूध दिसतं परंतू आता विष भरलेलं आहे.