रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (20:15 IST)

Career Tips :Advanced CA होण्यासाठी या 4 गोष्टी लक्षात ठेवा

How To Become a Advanced Chartered Accountant CA Tips : अकाउंटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी IIT आणि IIM च्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटिंग (IIA) उघडण्याची तयारी सुरू आहे. जेथे 5 वर्षांच्या यूजी कोर्सनंतर विद्यार्थ्यांना सीएच्या समकक्ष पदवी दिली जाईल. एवढेच नाही तर आता सीए कोर्स दर पाच वर्षांनी अपडेट केला जाईल, ज्यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, सिस्टम ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट, सायबर सिक्युरिटी यांसारखे लेटेस्ट अपडेट्स देखील समाविष्ट केले जातील. ऍडव्हान्स्ड सी.ए. होण्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा. 
 
1 बेस्ट प्रॅक्टिसेस -
 ICAI आंतरराष्ट्रीय अकाउंटन्सी संस्थांच्या बेस्ट प्रॅक्टिसेसचा समावेश करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी एक नवीन योजना देखील सुरू करत आहे. इथे आता  अशा परिस्थितीत या क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे अधिक योग्य ठरेल.
 
2 प्रॅक्टिकल ट्रेनींग-
 CA च्या तयारीसाठी, विद्यार्थी इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रॅक्टिकलशिप /आर्टिकलशिप सुरू करतात. पण अनेकदा कामाचा ताण आणि 8 विषयांच्या अभ्यासाचे दडपण यामुळे ते संभ्रमात राहतात. यामुळेच ते डमी आर्टिकलशिप निवडतात. ते योग्य नाही. यामुळे, त्यांना त्यांचे ज्ञान व्यावहारिकरित्या कसे वापरावे हे समजत नाही आणि आवश्यक कौशल्यांपासून ते वंचित राहतात. त्यामुळे असे करू नका. आर्टिकलशिप दरम्यान तुम्हाला ऑडिटसाठी शहराबाहेर जावे लागते, काम नियोजित तारखांमध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाच्या दबावाला देखील सामोरे जावे लागते .
 
3 इंडस्ट्रियल ट्रेनिंग-
 ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस किंवा व्यवसाया व्यतिरिक्त नोकरी करायची आहे त्यांनी आर्टिकलशिप दरम्यान इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. CA चा अभ्यास करणारे विद्यार्थी ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात आयपीसीसी उत्तीर्ण केले होते ते फायनेन्शिअल एनालिस्ट इंटर्नसाठी इंडस्ट्री ट्रेनीज पात्र असतात. इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या अशा संधींमुळे तुम्हाला उत्तम कौशल्ये शिकण्याची संधी मिळू शकते. 
 
4 स्वतःचा स्टार्टअप -
CA नंतर तुमचे स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे हा एक चांगला पर्याय आहे. क्लिअर टेक्स , खाता बूक, फिनाले, प्रॉफिट बुक्स यासह अनेक उपक्रम या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. 2027 पर्यंत, भारतीय अकाउंटिंग सॉफ्टवेअर मार्केट $17.12 बिलियनचे असेल. इथेही संधी मिळू शकते. CA स्टार्टअप संस्थापकांना ICAI वेबसाइट startup.icai.org/existing-start-ups वर मार्गदर्शन मिळू शकते.