बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (15:26 IST)

एमबीए नंतरच्या संधी

आजकाल करिअरच्या नवनव्या वाटा समोर येत आहेत. नवनवीन क्षेत्रं खुली होत आहेत. त्याच प्रमाणे कारकिर्दीच्या नवनवीन संधीही निर्माण होत आहेत. असं असलं तरी एमबीए या अभ्यासक्रमाला मागणी कायम आहे. एमबीए झाल्यानंतर चांगल्या कंपनीत भरपूर पगाराची नोकरी मिळते. म्हणून एमबीए करण्याकडे बर्या च तरुणांचा ओढा असतो.
 
एमबीए प्रवेशासाठी ‘कॉमन अॅडमिशन टेस्ट' म्हणजे ‘कॅट' परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेला बसणार्याच विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच जास्त असते. आता इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर एमबीए करावं का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याबाबतचं मार्गदर्शन...
 
* इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांकडे तांत्रिक ज्ञान असतं. या ज्ञानाला एमबीएची जोड दिल्यावर विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळतं. अशा विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. दोन्ही विषयांचं ज्ञान असणार्याि उमेदवारांना मागणीही वाढते. इंजिनिअरिंगनंतर विद्यार्थी त्यांच्या शाखेशी संबंधित नोकर्यांासाठी अर्ज करू शकतात. मात्र एमबीए केल्यानंतर भारतीय कंपन्यांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. शिवाय स्वतःचा उद्योगही सुरू करता येतो.
 
*इंजिनिअरिंगचं विश्व तुलनेने बरंच लहान आहे. मात्र एमबीए केल्यानंतर असंख्य कंपन्यांची कवाडं तुमच्यासाठी खुली होऊ शकतात. एमबीए केल्यामुळे तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. सध्या स्टार्ट अप्सची चलती आहे. इंजिनिअरिंगसह एमबीएचं ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचा उोग सुरू करू शकता. विविध संकल्पनांवर आधारित स्टार्ट अप्स चांगली कामगिरी करताना दिसतात. त्यामुळे इंजिनिअरिंग केल्यानंतर एमबीए करणं अनेक अर्थांनी योग्य ठरतं.
अभय अरविंद