शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (12:13 IST)

वाढत्या वजनावर बटाट्याचा उतारा

आजकाल वजनवाढीच्या समस्येने अनेकांना चिंता वाटत आहे. म्हणून वजन कमी करण्यासाठी उपायही केले जातात. भाताप्रमाणेच बटाट्याची गणनाही वजन वाढवणार्याब घटकांमध्ये केली जाते. मात्र, बटाटा वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ करू शकतो. बटाट्यामध्ये बरेच पोषक घटक असतात. या सर्व पोषक घटकांचे लाभ मिळवण्यासाठी बटाटा उकडून, थंड करून खायचा.
 
बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यासोबतच यात फायबरही असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते. याशिवाय पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहाते आणि कोलेस्टेरॉलही कमी होते.

बटाट्यात अ, क आणि ब ही जीवनसत्त्वे असतात. यातल्या गुंतागुंतीच्या कर्बोदकांमुळे पोट अधिक काळ भरलेले राहाते.

वजन कमी करण्याच्या उद्देशाने बटाटा खायचा असेल तर तो आधी उकडून घ्या. पूर्णपणे थंड होऊ द्या. आता हा बटाटा कुस्करून, त्यात मिरपूड, तिखट, थोडे मीठ, मिरची, कोथिंबिर घालून खाता येईल. न्याहरीसाठीही हा चांगला पर्याय ठरू शकतो.

बटाट्यात दही घालूनही खाता येईल. त्यामुळे वजन कमी करणार्यांथनी आहारात बटाट्याचा समावेश करायला हरकत नाही. योग्य पद्धतीने खाल्ल्यासबटाटा बराच लाभदायी ठरू शकतो.
प्राजक्ता जोरी