शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (13:36 IST)

आठवड्याभरात चेहऱ्यावरील कळपटपण दूर करतील हे 5 घरगुती उपाय

धूळ, माती आणि वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्याचा रंग मंदावतो. अशाने जर आपण दररोज आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली नाही तर त्याचे अजून वाईट परिणाम होऊ शकतात. जसे की मुरुमांमुळे कोरडेपणा आणि त्वचेची नैसर्गिक चमक कमी होऊन त्वचा काळपटते. 
 
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते जास्त काळ उन्हात राहण्यामुळे त्वचेमध्ये कळपटपण येतो. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, डार्क पॅचेस सारख्या समस्या उद्भवतात. तरी,या काळपटपणाला क्रीम आणि मेकअपने हलकं करण्यापेक्षा घरगुती उपाय करणं हा चांगला पर्याय आहे.
 
हळद
चेहऱ्याचा काळपटपणा स्वच्छ करण्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे दूध मिसळा. आता ही पेस्ट बाधित असलेल्या भागावर लावून हळुवार चोळा. 15 मिनिटानंतर पाण्याने धुऊन टाका. एक दिवसा आड आपण या हळदीच्या घरगुती उपायाने चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी वापरू शकता. लक्षात ठेवा की 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त हळद चेहऱ्यावर राहू देऊ नका. असे केल्याने चेहरा पिवळट होईल.
 
लिंबू 
एका लिंबाचा रस पिळून घ्या. या मध्ये समप्रमाणात स्वच्छ पाणी मिसळा आणि आपल्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावून 20 मिनिटे सोडा नंतर पाण्याने धुऊन घ्या लक्षात ठेवा या नंतर साबणाचा वापर अजिबात करू नये. आपण एक दिवस सोडून हा उपाय करू शकता. लिंबाचा हा उपाय करून लगेचच उन्हात जाऊ नका. कारण हे आपल्या त्वचेला नाजूक बनवतं आणि पुन्हा आपल्याला सनबर्नचा त्रास होऊ शकतो. 
 
बटाटे
बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करता येऊ शकतो. यासाठी सर्वात आधी एक बटाटा किसून घ्या आणि यात एक चमचा मध मिसळा. या मिश्रणाला चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून लावून 15 मिनिटे सोडा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. या मास्कला एक दिवस सोडून लावल्याने चेहऱ्याचा काळपटपणा दूर होईल. जर का आपल्याला बटाट्याचा मास्क लावून खाज किंवा जळजळ होत असल्यास त्वरित मास्क स्वच्छ करा. 
 
बदाम तेल
बदामाच्या तेलाच्या काही थेंब आपल्या चेहऱ्यावर लोशन प्रमाणे लावा. चेहऱ्यावर जिथे काळपटपणा आहे त्या जागी जास्त लावा. लक्षात ठेवा की आपल्याला चेहरा धुवायचा नाही. चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी बदामाचे तेल दररोज रात्री झोपण्याचा आधी लावावे. 
 
कोरफड
कोरफड जेल थेट बाधित जागेवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. दररोज हा उपाय केल्याने आपण चेहऱ्याचा काळपटपणा दूर करू शकता.