मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (10:55 IST)

गोरा चेहरा हवा असल्यास वापरा हळद आणि मधाचा घरगुती पॅक

बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. 
हळद ही आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्वचा स्वच्छ, संसर्गमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
हळद वापरल्याने चेहरा सतेज बनतो. हळदीत मध आणि दुधाचा वापर करून आपण ह्याच्या गुणधर्मात वाढ करता येते.
आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
आपण घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्याची उत्तमरीत्या निगा ठेवू शकतो. 
 
चेहरा गोरा आणि सुंदर बनविण्यासाठी हळदी फेस पॅक
1 चमचा हळद पावडर, 2 चमचे दूध, 1 चमचा मध घेऊन ह्यांना एकत्र मिसळून ह्याची पेस्ट करून आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. नंतर चेहरा गार पाण्याने धुऊन घ्या.
 
टीप: चांगल्या परिणामासाठी दररोज ह्याची पुनरावृत्ती करा.