1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (09:05 IST)

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहणार!

Prohibition order will be enforced in Maharashtra Secondary Service Examination Center premises!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार 26 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराज पत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2021 ही जळगाव शहरातील 32 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहतील. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
 
जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1)(2) व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे. 26 रोजी शहरातील एकूण 32 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यांतील सर्व परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर परीक्षेचे दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते पेपर रवाना होईपर्यंत प्रत्येक उपकेंद्रावर 3 पुरुष व 2 महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करावा, परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक शनिवार 26 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.