बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (11:37 IST)

SSB NDA 2020 : स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक करण्यासाठी हे करा

NDA ची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर SSB मुलाखतीला सामोरी जाणे विध्यार्थ्यांसाठी मोठे आव्हानात्मक असतं. बरेच विद्यार्थी मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यावर म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट किंवा चाचणीचे नियम आणि त्याला क्रॅक करण्याचा काही सोप्या टिप्स सांगत आहोत.

सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की विद्यार्थ्याने आपले कागदपत्रे, ओळखपत्रे, छायाचित्रे आणि रिपोर्ड कार्ड देखील आपल्या जवळ बाळगावे. NDA लेखी परीक्षा क्रॅक करणाऱ्या विद्यार्थीना UPSC मुलाखत सेंटर वर पाठवतात. जिथे रिपोर्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपले स्क्रीन टेस्ट होते. जर आपण दुपारी 12 वाजेच्या पूर्वी रिपोर्टिंग केली असल्यास तर आपले स्क्रीनिंग टेस्ट किंवा चाचणी त्याच दिवशी घेतली जाणार आणि 12 वाजे नंतर आल्यास आपली चाचणी दुसऱ्या दिवसा पासून घेतली जाणार.
 
स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक करण्याच्या सोप्या टिप्स : 
रिझनींग विभाग तयार ठेवा - स्क्रीनिंग चाचणी किंवा टेस्ट मध्ये सर्वप्रथम आपल्याला OIR(ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग) परीक्षा द्यावी लागेल. या मध्ये विद्यार्थ्यांना तोंडी आणि नॉन वर्बल रिझनींगचे 50 प्रश्न विचारले जातात. यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा वेळ दिला जातो. ही चाचणी 75 ते 100 गुणांची असू शकते. आपल्याला रिझनींगवर जास्त प्रभुत्व ठेवणे आवश्यक असत. ही चाचणी आपल्या गुणांना सुधारण्यात मदत करते.  
 
PP & DT चाचणी - स्क्रीनिंगची दुसरी पायरी म्हणजे पीपी आणि डीटी चाचणी. या मध्ये विद्यार्थ्यांची मानसिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. या मध्ये उमेदवारांना छायाचित्रे दाखवतात ज्या आधारावर त्यांना गोष्ट सांगायला आणि लिहायला सांगतात. लिहिण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ दिला जातो आणि बोलण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ दिला जातो. 
 
* बेसिक लेव्हल - लक्षात ठेवा की जेव्हा आपण चित्र बघून गोष्ट बनवत आहात ती आपल्याला मूळभूत पातळीची गोष्ट बनवायची आहे. त्यात अतिशयोक्ती नसावी.
 
* स्वतःला कथेचे पात्र ठेवा - आपण स्वतःला कथेचे पात्र म्हणून ठेवल्यास तर आपल्याला कथा बनविण्यासाठी सोपे होणार. आपण आपल्या जवळपासच्या गोष्टींना जोडून एक कथा तयार करू शकता. 
 
* आत्मविश्वास कमी करू नका - गोष्ट सांगताना आपल्या आत्मविश्वासाची चाचणी केली जाते. आपण गोष्ट सांगताना आत्मविश्वासी असावे. गोष्ट सांगताना अडकू नये. तसेच कथन सांगताना ते योग्य असावे.
 
* मित्र बनवा - स्क्रीनिंग चाचणी नंतर ग्रुप टास्क असतं. त्यामध्ये जाण्याच्या पूर्वी आपण आपल्या सह भाग घेणाऱ्या सह मैत्री करावी. जेणे करून आपले गट तयार करताना ते आपली मदत करतील. तसेच गटात ते आपल्या म्हणण्याला महत्त्व देखील देतील. ही युक्ती आपणास चांगले परिणाम मिळविण्यात मदत देखील करेल. 

या व्यतिरिक्त आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळी व्यायाम करावयाचे असते. स्वतःला निरोगी ठेवायचे आहे आणि कोणत्याही कार्यात कामगिरीची पातळी कमी करू नये.  
 
भारतीय सैन्यात सामील होणं ही अभिमानाची बाब आहे, आपल्याला ही भारतीय सेवेत रुजू होऊन देशाची सेवा करायची असल्यास तर NDA /NA नक्कीच उत्तम करियरचा पर्याय आहे. 
 
अधिक माहितीसाठी या  https://bit.ly/3p3fpjT संकेत स्थळावर भेट द्या.
 
या कोर्सच्या अधिक माहिती साठी या https://forms.gle/6NZDQPL59BrnHaj98 फॉर्म भरा.