शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated : सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (09:36 IST)

प्रतिकारक शक्तीच नव्हे, तर अन्नाची चव देखील वाढवते ही तुळशीची चटणी

तुळशीची चविष्ट चटणी रेसिपी 
सर्दी पडसं पासून आराम मिळविण्यासाठी तुळशीचा चहा तर आपण बऱ्याच वेळा घेतला असणार पण आपणास माहीत आहे का की तुळशीचा वापर अन्नात वाढल्या जाणाऱ्या चटणीमध्ये देखील केला जाऊ शकतो. तुळशीच्या पानांची ही चटणी अन्नाची चव वाढवते त्याच बरोबर आपल्या दररोजच्या बऱ्याच लहान मोठ्या समस्या दूर करते. मग उशीर कसला चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची तुळशीची ही चविष्ट चटणी. 
 
साहित्य -
तुळशीचे पान - 1/4 कप
हिरवी कोथिंबीर - 1 कप
आलं - अर्धा इंच 
मीठ - चवीप्रमाणे 
लाल मिरच्या - 2
हिरव्या मिरच्या - 2 
ऑलिव्ह तेल - 2 लहान चमचे 
लिंबाचा रस - 1 लहान चमचा
 
 
तुळशीची चटणी बनविण्याची कृती -
तुळशीची चटणी बनविण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर आणि तुळशीच्या पानांना चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. एका भांड्यात हिरवी कोथिंबीर, तुळशीचे पान, लाल मिरच्या, आलं, लाल-हिरव्या मिरच्या आणि ऑलिव्ह तेल घाला. या नंतर यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ घाला. सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे वाटून घ्या. आपली चविष्ट अशी ही तुळशीची चटणी तयार आहे. आपण या चटणीला गरम भजी, समोसे किंवा जेवणात देखील सर्व्ह करू शकता.