साहित्य : 2 कप किसलेले अननस, 4 मोठे चमचे साखर, 1 चमचा मनुका, 1 चमचा चाट मसाला, 1 सुकलेली लाल मिरची, 1 चमचा तेल, 1/4 मीठ.
कृती : फ्राइंगपॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुकलेली लाल मिरचीचे तुकडे करून टाकावे. नंतर त्यात अननसाचा कीस टाकावा. मीठ व साखर टाकून 15 मिनिटापर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर चाट मसाला टाकून सँडविच किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करावे. लहान मुलांना हे फारच आवडते.