साहित्य:- चिरलेला कांदा १ वाटी, कैरी चिरलेली (सालासहित) अर्धी वाटी, जिरे अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, गूळ चिरलेला १ वाटी, फोडणीचे साहित्य, तेल १ डाव, चिरलेला पुदिना २ चमचे.
कृती:- मिक्सरमधून कांदा, कैरी, जिरे, तिखट, मीठ, पुदिना बारीक वाटावे. नंतर त्यात गूळ घालून परत एकदा मिक्सर फिरवावा. वाटण बाऊलमध्ये काढल्यावर तेल गरम करून छान चरचरीत फोडणी चटणीवर घाला. छान आंबटगोड चटणी तयार.