मंगळवार, 10 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

वांग्याची चटणी

- स्मिता

वांग्याची चटणी
ND
साहित्य : अगदी कोवळी ताजी वांगी, 4-5 हिरव्या मिरच्या, दाण्याचे कूट अर्धी वाटी, कोथिंबीर, गूळ, मीठ, लिंबू, फोडणीचे साहित्य.

कृती : प्रथम वांग्याचे लहान लहान तुकडे 1 वाटी घ्यावे. बिया असल्यास काढाव्यात. मिरच्याचे तुकडे मोठेच करावेत. एका मिरचीचे दोन तुकडे याप्रमाणे अर्धी वाटी तेलाची मोहरी टाकून फोडणी करावी. त्यात थोडा जास्त हिग घालावा. नंतर फोडणीवर वांग्याचे व मिरच्याचे तुकडे टाकून चांगली वाफ आणावी. कढई खाली उतरवून वाफ आलेल्या मिरच्या घेऊन त्यात गूळ, मीठ टाकून हाताने कुस्करून मऊ करावे नंतर तो गोळा, कोथिंबीर, दाण्याचे कूट हे सर्व वांग्याचा फोडीवर घालून सर्व चांगले मिसळावे. आंबटपणाकरिता थोडा लिंबाचा रस चवीप्रमाणे टाकावा. ही चटणी जाडसर चांगली लागते.