रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By

छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ

shivaji maharaj
भोसले घराण्याचा विषयी प्रथम थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांच्यापासून पण त्यापूर्वीची काही विशेष माहिती नाही. 
 
बाबाजी भोसले जन्म १५३३
बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी भोसले आणि विठोजी भोसले 
 
मालोजी भोसले जन्म १५४२
पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या. मालोजी भोसले यांचे दोन पुत्र.
शाहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज)
शरीफजी - पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.
 
शहाजीराजे भोसले जन्म १५९४
शहाजी महाराजांच्या तीन पत्नी होत्या 
जिजाबाई यांना दोन पुत्र होते - संभाजी आणि द्वितीय पुत्र शिवाजी महाराज
तुकाबाई यांना पुत्र - व्यंकोजी उर्फ एकोजी राजे 
नरसाबाई यांना पुत्र - संताजी
 
संभाजी जन्म १६२३
शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. अफजल खानाने दगाफटका केल्यामुळे संभाजी १६५५ साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारल्या गेले.
 
शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी -
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (इंगळे)
८. सकवारबाई (गायकवाड)
 
शिवाजी महाराज यांचे मुले - संभाजी, राजाराम,
 
शिवाजी महाराज यांच्या मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर
 
संभाजी महाराज जन्म १६५७
छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते आणि त्या दोघांच्या पुत्राचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते.
 
राजाराम महाराज जन्म १६७०
छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई, जानकीबाई, आणि राजसबाई
ताराबाईंचे पुत्र शिवाजी द्वितीय
राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी या आपल्या मुलाला कोल्हापूर च्या गादीवर बसवलं.
 
छत्रपती शाहू महाऱाज जन्म १६८२
संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहु महाराज हे सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत. छत्रपती शाहू महाराज १७४९ मध्ये निपुत्रिक वारले. त्यांच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आले. रामराजासुद्धा निपुत्रिक होते त्यामुळे त्यांच्या जागी दुसरे शाहू हे दत्तक पुत्र गादीवर आले व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह छत्रपती बनले. 
 
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 
साताऱ्याचे उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज मानण्यात येतात. ते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र होय. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत.
 
युवराज संभाजी राजे छत्रपती
सध्या कोल्हापूर संस्थानची धुरा शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे. युवराज संभाजी राजे त्यांचे चिरंजीव आहेत.

हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे.