गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (10:10 IST)

राजा जयसिंहांच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र

भारताच्या इतिहासात असे दोन पत्र मिळतात. ज्यांना दोन प्रसिद्ध महापुरुषांनी दोन कुप्रसिद्ध व्यक्तींना लिहले होते. यात पहिले पत्र "जफरनामा" म्हणून ओळखले जाते. ज्याला श्री गुरु गोविन्द सिंह यांनी औरंगजेबला भाई दया सिंहांच्या हातून पाठवले होते. हे दशम ग्रंथ मध्ये समाविष्ट आहे ज्यात कुल 130 पद आहे. दूसरे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आमेरचे राजा जयसिंह यांना पाठवले होते जे त्यांना 3 मार्च 1665 ला मिळाले होते. या दोन्ही पत्रांमध्ये ही समानता आहे की दोन्ही फारसी भाषेत शेर या रुपात लिहले गेले आहे. दोघांची पार्श्वभूमी आणि विषय एक सारखे आहे. दोघांनी भारत देश आणि धर्म बद्द्ल अटूट प्रेम व्यक्त केले आहे. 
 
छत्रपती शिवजी महाराजांचे पत्र अनेक वर्षांपर्यंत पटना साहेब गुरुद्वारा ग्रंथागार मध्ये ठेवले होते.  नंतर पत्राला "बाबू जगन्नाथ रत्नाकर" ने सन 1909 एप्रिलला काशीमध्ये काशी नागरी प्रचारिणी सभामध्ये प्रकाशित केले होते. नंतर अमर स्वामी सरस्वतींनी त्या पत्राचा हिंदीमध्ये पद्य आणि गद्य मध्ये अनुवाद केला. मग सन 1985 अमरज्योति प्रकाशन गाजियाबादने पुनः प्रकाशित केले. 
 
राजा जयसिंह आमेरचे राजा होते. जयसिंह सन 1627 ला आमेरच्या गादीवर बसले होते व ते औरंगजेबचे मित्र होते. शाहजहाँने त्यांना 4000 घोडेस्वारांचा सेनापति बनवून "मिर्जा राजा" ही पदवी दिली होती. औरंगजेबला संपूर्ण भारतवर्षात इस्लामी राज्य पसरवायचे होते. पण छत्रपती शिवजी महाराजांमुळे तो यशस्वी होत न्हवता. औरंगजेब चतुर आणि धूर्त होता. त्याने पहिले छत्रपतींसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि मैत्रीच्या बदल्यात छत्रपतींकडून 23 किल्ल्यांची मागणी केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा प्रस्ताव स्वीकारला केला नाही व 1664 मध्ये सुरतवर स्वारी केली आणि मुघलांची ती सर्व संपत्ती लूटली जी मुघलांनी हिंदूंकडून लुटली होती. मग औरंगजेबने त्याचा मामा शाईश्ता खान सोबत व 40 हजार फौज घेऊन छत्रपतींवर हल्ला केला मग छत्रपतींनी पुण्याच्या लाल महालमध्ये औरंगजेबचे बोटे कापली व तो पळून गेला.  मग औरंगजेबने राजा जयसिंह यांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना पराभूत कर. 
 
जयसिंह स्वत:ला श्रीरामांचे वंशज मानायचे. त्यांनी युद्धात यशस्वी होण्याकरिता एक सहस्त्र चंडी यज्ञ केले होते. छत्रपतींना याची खबर लागली होती. जेव्हा छत्रपतींना समजले की औरंगजेब हा हिंदूंना हिंदूंविरुद्ध भडकवत आहे. असे झाल्यास दोन्ही बाजूंनी हिंदूच संपतील. तेव्हा छत्रपती शिवजी महाराजांनी राजा जयसिंह यांना समजवण्यासाठी पत्र पाठवले. त्यातील काही अंश खालील प्रमाणे-
 
1. जिगरबंद फर्जानाये रामचंद ज़ि तो गर्दने राजापूतां बुलंद।
हे रामचंद्रांचे वंशज, तुमच्याकडून तर क्षत्रियांसाठी आदर वाढत आहे.
 
2 शुनीदम कि बर कस्दे मन आमदी -ब फ़तहे दयारे दकन आमदी।
ऐकले आहे की तुम्ही दख्खनच्या दिशेला आक्रमण करण्यासाठी येत आहत.
 
3 न दानी मगर कि ईं सियाही शवद कज ईं मुल्को दीं रा तबाही शवद।
तुम्हाला हे माहित नाही का देश आणि धर्म उधवस्त होईल.
 
4 बगर चारा साजम ब तेगोतबर दो जानिब रसद हिंदुआं रा जरर
जर मी माझ्या तलवारीचा प्रयोग केला तर दोन्ही बाजूंनी हिंदूच गतप्राण होतील.
 
5 बि बायद कि बर दुश्मने दीं ज़नी बुनी बेख इस्लाम रा बर कुनी।
योग्य हेच राहिल की धर्माचे दुश्मन इस्लामला मुळापासून नष्ट करा.
 
6 बिदानी कि बर हिन्दुआने दीगर न यामद चि अज दस्त आं कीनावर।
तुम्हाला माहीत नाही या कपटी धूर्त माणसाने हिंदूंवर किती अत्याचार केलेत.
 
7 ज़ि पासे वफ़ा गर बिदानी सखुन चि कर्दी ब शाहे जहां याद कुन
या माणसाच्या इमानीपणाचा काय फायदा. तुम्हाला माहीत नाही का याने स्वत:चे वडील शाहजहाँ सोबत काय केले ते.
 
8 मिरा ज़हद बायद फरावां नमूद -पये हिन्दियो हिंद दीने हिनूद
आपल्याला एकत्रित येऊन हिंद देश हिन्दू धर्म आणि हिंदूंसाठी लढले पाहिजे.
 
9 ब शमशीरो तदबीर आबे दहम ब तुर्की बतुर्की जवाबे दहम।
आपण आपल्या तलवारीने दुश्मनला जशास तसे उत्तर पाहिजे पाहिजे.
 
10 तराज़ेम राहे सुए काम ख्वेश - फरोज़ेम दर दोजहाँ नाम ख्वेश
जर तुम्ही माझा उपदेश ऐकला तर तुमचे लोक परलोकमध्ये नाव होईल. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik