Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 13 ऑक्टोबर 2010 (08:31 IST)
बॅडमेंटन: साईनाची फायनलमध्ये धडक
महिला बॅडमेंटनच्या एकेरी गटात भारतीय स्टार खेळाडू साईना नेहवालने फायनलमध्ये धडक मारली आहे.
स्कॉटलंडच्या सुसान एगलस्टॉकचा 21-10,21-17 असा एकतर्फी पराभव करत साईनाने फायनलमध्ये प्रवेश केल्याने भारताच्या खात्यात आता आणखी एक सुवर्ण पदक पडेल अशी चाहत्यांची आशा आहे.
साईनाने या सामन्यात अत्यंत आक्रमक खेळ केल्याने सुसानच्या खेळात निराशा स्पष्टपणे जाणवत होती.
फायनलमध्ये साईनाला मलेशियाच्या मेव चू वोंगशी भिडावे लागणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास साईनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागणार आहे.