बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी

'तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही... तुम किसी और को चाहोगी तो मुश्‍कील होगी, अशा शब्दांत रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी डाव्या पक्षांना साद घातली.

चार साल पहले हमे तुमसे प्‍यार था...और आज हम बेवफा सनम हो गये...' असे म्हणून त्यांनी डाव्यांना कोपरखळीही मारली. विश्वासदर्शक ठरावाच्या दोन दिवसातील गंभीर आणि वादावादीच्या चर्चेत लालूंचे भाषण हलके फुलके ठरले. त्यामुळे दुपारपर्यंत झालेल्या चर्चेचे हिरो लालू ठरले नसते तरच नवल.

सरकारची बाजू मांडताना लालूंनी विरोधकांची व डाव्‍या पक्षांची जोरदार खिल्‍ली उडवित त्‍यांच्‍यावर देशहिताशी खेळत असल्‍याचा आरोप केला. भाषणाची सुरूवात करतानाच आपल्‍या खास लालू स्‍टाईलमध्‍ये त्‍यांनी विविध चित्रपट गीतांच्‍या मदतीने आपले म्‍हणणे मांडण्‍यास सुरूवात केली. कालचा दिवस शंकराचा सोमवार होता आणि आज महावीर हनुमानाचा मंगळवार आहे. हनुमानजीच विरोधकांवर आता गदा हल्‍ला करून त्‍यांची दाणादाण उडवून देतील असा विश्‍वास त्‍यांनी केला.