बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वार्ता|

संपुआ-रालोआ यांचा कुटील डाव-मायावती

ND
विश्वासमत ठरावात मनमोहन सिंग सरकारला पराभूत करणे निश्चित होते मात्र यूपीए आणि एनडीए यांनी आपसात कुटील डाव रचून सरकारला विजय मिळवून दिला असल्‍याचा आरोप बसपाच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्र सरकारने विश्वासमत ठराव जिंकल्‍याबददल प्रतिक्रिया देताना केला आहे.

मायावती यांनी सांगितले, की त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली सरकार बनविण्‍यासंदभा्रत तिस-या आघाडीने हालचाली सुरू केल्‍यानंतर रालोआ आणि संपुआ यांनी एकत्र येउन जाणून बुजून सरकारला विश्‍वासमत जिंकण्‍यास मदत केली आहे. दलित आणि शोषित समाजातील महिला पंतप्रधान बनू नये यासाठीच त्‍यांनी असा कुटील डाव रचल्‍याचा आरोप मायावती यांनी केला आहे.