1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:26 IST)

मुंबईत कोरोनाचे एका दिवसात 120 नवे रुग्ण

मुंबईत 21 सप्टेंबर रोजी दिवसभरात 120 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या 11 लाख 49 हजार 235 वर पोहोचली आहे.
 
दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 19 हजार 726 वर पोहोचली आहे. दिवसभरात 192 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 11 लाख 28 हजार 573 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 936 सक्रिय रुग्ण आहेत.
 
काल राज्यात 550 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 772 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 79,63,854 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.